श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य गीत रामायण स्पर्धा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा नगरीत प्रथमच नेहा वैद्य आणि सतीश वाघ यांच्या संकल्पनेतून तसेच भारती वैद्य यांच्या मार्गदर्शनाने अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्यसमूह गीत रामायण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाकरिता आमदार अमोल चिमणराव पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, तालुका संघप्रमुख मुकेश चोरडिया, आकाश बडगुजर, वसंतराव ठाकूर एरंडोल , बालाजी व्यंकटेश अन्नदान समितीचे सदस्य अनिल गुजराथी, दिनेश गुजराथी, तसेच पत्रकार प्रतिक मराठे, बोहरा स्कूलच्या प्रिन्सिपल शोभा सोनी, मृणाल अमोल पाटील, किरण चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या गीत रामायण स्पर्धेस अश्विनी कुलकर्णी आणि विना कमलाकर परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने तसेच बासरी वादनाने करण्यात आली गीत रामायण कार्यक्रमात २४ संघांनी सहभाग घेतला. या मधे २ बाहेर गावच्या संघाने देखील कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात सर्व प्रेक्षक श्रीरामांच्या नामस्मरणा रमून गेल्याचे दिसले अतिशय भक्तिमय असं वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विजेते संघ मोठा गट प्रथम क्रमांक -बोहरा सेंट्रल स्कूल, पारोळा प्रथम क्रमांक बाल गट – स्वर संगीत क्लास ग्रुप प्रथम क्रमांक खुलागट गिरीश टोळकर द्वितीय क्रमांक खुलागट हरीश देशपांडे उत्तेजनार्थ – प्रथमेश शेंडे या सर्व संघाना श्री रामाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात तबला वादक म्हणून आदिती वैद्य, मोहित तांबे, पुष्कर पुराणिक, रुद्रवर्धन मराठे तसेच हार्मोनियम वादक गिरीश टोळकर गौरव महाजन, प्रद्युम्न पाटील होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर गवांदे व सतीश वाघ यांनी केले या कार्यक्रमात रेखाताई चौधरी, मयूर गवांदे, प्रथमेश शेंडे अनमोल सहकार्य केले.

Protected Content