यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलांच्या आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने भरारी बहुउद्देशीय संस्था,जळगाव या संस्थेच्या वतीने विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात येतात खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटांचा महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या बहिणाबाई महोत्सव २०२५ याचे १० व्या वर्षाचे आयोजन दिनांक २३ ते २७ जानेवारी दरम्यान सागर पार्क, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात सामाजीक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भरारी फाउंडेशनच्या वतीने या वर्षाचा “बहिणाबाई विशेष सन्मान”पुरस्कार सामाजिक क्षेत्र व पर्यावरण या विषयात कार्ये करणाऱ्या कल्पतरू सेवा फाउंडेशन,किनगाव या संस्थेला प्रदान करत कल्पतरू सेवा फाउंडेशनचे पदअधिकारी यांना कारागृह अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देत गौरवण्यात आले. यावेळी उमेश आबाजी पाटील, दीपक चव्हाण,देवेंद्र पाटील,सुभाष पाटील,भरत ठाकुर,अनिल पाटील, धीरज चौधरी,दुर्गेश अत्तरदे,भूषण खंबायत,हर्षल पाटील,योगेश पाटील,नरेंद्र पाटील,अक्षय पाटील व मयूर पाटील इ. सह मान्यंवर उपस्थित होते.