भुसावळात राजपूत करणी सेनेतर्फे भव्य सत्कार सोहळा !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळातील स्टार लॉन्स येथे शुक्रवारी २७ जून रोजी दुपारी १२ वाजता श्री राजपूत करणी सेनेच्या भुसावळ शाखेने राजपूत समाजातील ४०० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि लघु उद्योजकांचा मंत्री संजय सावकारे आणि आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते सत्कार करून त्यांना सन्मानित केले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा शीला सुखदेवजी गोगामेडी या होत्या. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये परमपूज्य महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराज, मंत्री ना. संजय सावकारे, आणि आ. किशोर पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राजपूत समाजाच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थी आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देणे, हा या सत्कार सोहळ्यामागील मुख्य उद्देश होता. यावेळी मोठ्या संख्येने राजपूत समाजातील बंधू-भगिनी उपस्थित होते. या सोहळ्यामुळे समाजात एकीची भावना वाढीस लागण्यास मदत झाली, तसेच समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सार्वजनिक स्तरावर गौरवण्यात आले. अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.