सहकार पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

( Image Credit Source : Twitter )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सहकार पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने या पुरस्कारांसाठी पात्र संस्था निवडण्यासाठी कार्यपद्धती आणि निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांकडून आता प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांना ०२ जुलै २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत आपले प्रस्ताव सादर करता येतील. हे प्रस्ताव संस्थेच्या मुख्यालयाच्या तालुक्याच्या संबंधित उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना आवाहन केले आहे की, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव वेळेत सादर करावेत. यामुळे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्याची संधी मिळणार असून, इतरांनाही प्रेरणा मिळेल.