गोविंदा आणि जॅकी श्रॉफला धक्का ; न्यायालयाने ठोठावला दंड

govinda and joki

मुंबई वृत्तसंस्था । अनेकदा फिल्मी कलाकार आणि क्रिकेटर प्रॉडक्ट्सची जाहिरात करत मोठमोठे दावे करत असतात. याचाच धक्का गोविंदा आणि जॅकी श्रॉफला बसला आहे. उत्तर प्रदेशमधील मुझ्झफरनगर येथील ग्राहक न्यायालयाने वेदनाशामक तेलाची जाहिरात करणाऱ्या गोविंदा आणि जॅकी श्रॉफला २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  पाच वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने निर्णय देताना हा दंड ठोठावला आहे.

काय होते प्रकरण ?
२०१२ साली अभिनव अग्रवाल यांनी वृत्तपत्रात आलेली एक जाहिरात पाहून आपले ७० वर्षीय पिता बृजभूषण अग्रवाल यांच्यासाठी हर्बल तेल खरेदी केले होते. गुडघेदुखीसाठी खरेदी केलेल्या या तेलाची किंमत ३,६०० रुपये इतकी होती. या तेलाचा नियमित वापर केल्यास केवळ १५ दिवसांत शरीरातील सर्व वेदना पळून जातील आणि जर वेदना कमी झाल्या नाहीत, तर १५ दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील, असा दावा या तेलाच्या जाहिरातीत गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांनी केला होता. कंपनीने जाहिरातीत छातीठोकपणे केलेला हा दावा खोटा निघाला. बृजभूषण यांची गुडघेदुखी १५ दिवसांनंतरही कमी झाली नाही. त्यामुळे अभिनव यांनी याबाबत कंपनीकडे तक्रार करुन आपले पैसे परत करण्याची विनंती केली. परंतू कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यानंतर अभिनव यांनी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली. हे संपूर्ण प्रकरण गेली पाच वर्षे न्यायालयात सुरु होते. अखेर न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आधारावर अभिनय यांच्या बाजूने निर्णय देत तेल कंपनी, गोविंदा, जॅकी श्रॉफ, टेलीमार्ट शॉपिंग नेटवर्क प्राइवेट लिमिटेड कंपनी या चौघांनाही दोषी ठरवले व त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता हे दौघेजण मिळून अभिनव यांना २० हजार रुपये परत करणार आहेत.

Protected Content