पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला “उत्कृष्ट जलसंवर्धक संस्था” पुरस्कार

Nashik news

रावेर (प्रतिनिधी)। नाशिक येथील कृषीथॉन प्रदर्शनात “उत्कृष्ट जलसंवर्धक संस्था” राज्यस्तरीय पुरस्कार आदिवासी भागातील सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्रा पाल यांना देण्यात आला. हा पुरस्कार दि २४ रोजी नाशिक येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील, खासदार हेमंत गोडसे,आमदार नितीन भोसले, प्रकाश मते, ठक्कर बिल्डर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

विज्ञान कृषी केंद्राचे कार्य
सातपुडा विकास मंडळ पाल संचलित कृषी विज्ञान केंद्रा मार्फत गेल्या पाच वर्षांपासून रावेर व यावल तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या जलक्रांतीच्या चळवळीस सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने पावसाचे पडणारे पाणी जिरवणे, पाणी संवर्धन पध्दती, नदीत चर खोदणे, लहान ओढ्यांवर बांध घालणे व वृक्ष लागवड असे वेगवेगळे उपक्रम लोकसहभागातून करण्यात आली आहेत. त्याच सोबत शासनाच्या जलशक्ती अभियानांतर्गत पाणी संवर्धनासाठी जनजागृती, शेतकरी मेळावा आयोजित करून पाणी चळवळ ही लोक चळवळ होण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राची वाटचाल सुरू आहे.

यांची स्विकारला पुरस्कार
सत्कार व पुरस्कार स्विकारण्यासाठी अजित पाटील, प्रभात चौधरी, संजय महाजन, डॉ.धीरज नेहेते, महेश महाजन, प्रमोद सरोदे, शरद तायडे, मिलिंद होले व मयूर नारखेडे उपस्थित होते.

Protected Content