महिलेच्या पर्समधून १४ हजारांचे सोन्याचे दागिन्यांची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टॉवर चौकात एका महिलेच्या पर्समधून १४ हजार रूपये किंमतीच्या सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी सोमवारी १९ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जानकीबाई भगवान पाटील वय-५२ रा. चोपडा ह्या महिला शनिवारी १७ मे रोजी जळगाव शहरात आलेल्या आहे. दरम्यान जळगाव शहरातील टॉवर चौकात कामानिमित्त आलेले होते. सायंकाळी ५ वाजता त्या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून १४ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या वस्तू चोरून नेली आहे. ही घटना घडल्यानंतर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश पाटील हे करीत आहे.