रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या चेअरमनपदी शीतल पाटील बिनविरोध


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या चेअरमनपदी शीतल रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सरदार जी. जी. हायस्कूलच्या सभागृहात आज (२० मे २०२५) झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

बिनविरोध निवड प्रक्रिया
रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष देवेंद्र मिसर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वानुमते शीतल रमेश पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी आणि उपस्थित मान्यवर
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र आठवले, सचिव अक्षय अग्रवाल, पदसिद्ध संचालक राजेंद्र अग्रवाल, नवनिर्वाचित संचालक संतोष अग्रवाल, शैलेंद्र देशमुख, महेश अत्रे, डॉ. दत्ताप्रसाद दलाल, तुषार मानकर, उज्वल अग्रवाल, विजय लोहार आदी उपस्थित होते. या निवडीसाठी सरदारजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील आणि कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री पुराणिक यांनी सहकार्य केले.

पारदर्शक कारभारावर भर आणि शतकपूर्ती महोत्सव
यावेळी नूतन कार्यकारिणीने पत्रकार परिषद घेऊन संस्थेचा कारभार राजकारण विरहित आणि पारदर्शक चालवणार असल्याचे सांगितले. पारदर्शकतेसाठी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी शाळेत सूचनापेटी ठेवण्यात येणार आहे. संस्थेचा २०२७ मध्ये शतकपूर्ती महोत्सव होणार असून, या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र आठवले यांनी दिली.