राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी मुलींचा संघ शिरपूरसाठी रवाना


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतर जिल्हा १४ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा १९ मे पासून शिरपूर येथील मिलिटरी हायस्कूलमध्ये सुरू होत आहेत. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली असून, संघ शिरपूरसाठी जिल्हा क्रीडा संकुल येथून रवाना झाला आहे.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतर जिल्हा १४ वर्षांखालील मुलींच्य संघांची घोषणा जिल्हा फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी केली. याप्रसंगी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष इम्तियाज शेख आणि सचिव फारुक शेख यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.

जळगाव जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत: संस्कृती पाटील, अश्विनी लक्ष्मीकांत, दिव्या बाविस्कर, परी रंगलानी, मनस्वी जाधव, इशा ढाके, युक्ती राजपूत, आरोही राणे, वेदश्री पाटील, नजम बोहरी, रितिका पाटील, यशवंती पवार, दर्शना कुंभार, आराध्या पाटील, धनश्री भोई , युगा पाटील, अनन्या पाटील, आणि अलीना स्वामी फ्रान्सिस याप्रमाणे आहे.

या संघाच्या व्यवस्थापक म्हणून छाया बोरसे काम पाहणार आहेत, तर राहील अहमद हे संघाचे प्रशिक्षक आहेत.