महायुतीच्या स्टार प्रचारकांमध्ये गिरीश महाजन यांना स्थान !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महायुतीच्या वतीने स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या नावाचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महायुतीच्या वतीने स्टार प्रचारकांची ४० नावे जाहीर करण्यात आली आहे. यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे आहेत. यात थेट पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाहा यांच्यापासून ते देश राज्यातील महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

या यादीत जळगाव जिल्ह्यातून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीभाऊ महाजन यांना देखील स्थान मिळालेले आहे. यामुळे ते जळगाव आणि रावेरच नव्हे तर राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये देखील प्रचारसभांना उपस्थिती लावणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content