चोपड्यात चुरशीची लढत; लता सोनवणेंना आघाडी

चोपडा प्रतिनिधी । येथे मतमोजणीत चुरशीची लढत झाल्याचे दिसून येत असून यात शिवसेनेच्या लताताई सोनवणे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या लताताई सोनवणे, राष्ट्रवादीचे जगदीश वळवी, अपक्ष प्रभाकर सोनवणे, अपक्ष माधुरी पाटील आणि अपक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांच्यात लढत झाली. आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर ही चुरस स्पष्टपणे दिसून आली. पहिल्यांदा जगदीश वळवी तर नंतर डॉ. चंद्रकांत बारेला यांना अल्प आघाडी मिळाली. मात्र नंतर लताताई सोनवणे यांनी आघाडी घेतली. पाचव्या फेरीअखेर त्यांना १५७६० मते मिळाली असून जगदीश वळवी-११९४९, चंद्रकांत बारेला ५९७९ तर प्रभाकर सोनवणे यांना ४७५८ मते मिळाली आहेत. यामुळे लताताई सोनवणे यांना जवळपास चार हजारांचा लीड मिळाल्याचे दिसून येत आहे.

Update : सातव्या फेरीअखेर लताताई सोनवणे यांना २१९०० मते मिळाली असून जगदीश वळवी-१९७५१, चंद्रकांत बारेला ७०१७ तर प्रभाकर सोनवणे यांना ९००० मते मिळाली आहेत. यामुळे लताताई सोनवणे यांना जवळपास दोन हजारांचा लीड मिळाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content