मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही खुदा होऊ नका : प्रकाश आंबेडकर

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे कोरोनाने नाही, पण रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीने माणसं मरतील. त्यामुळे लॉकडाऊन वाढवू नका तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही खुदा होऊ नका, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण कोरोना मृत्यूदर आटोक्यात आणू, असे ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे, विनंती…खुदा होऊ नका. कोरोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. मीही त्यावेळेस भ्यायलो होतो. परंतू कोरोना मृत्यूदर आज दोन टक्के किंवा त्याच्या थोडा वर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचे मरण निश्चित. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावे. तरच माणसे जगतील, नाहीतर उपासमारीने माणसे मरतील अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, लॉकडाऊन आपण वाढवू नका” अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Protected Content