शैलश कुलकर्णी यांना रांगोळी कलेसाठी बेस्ट यंग अचिव्हर पुरस्कार प्रदान

पाचोरा प्रतिनिधी । तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविथा अक्का यांच्या वाढदिवसानमित्त हैदराबाद येथे ६० बाय ४० फुटाच्या आकाराची भव्य रांगोळी स्पर्धेत पाचोरा येथील युवा रांगोळीकार व चित्रकार कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांना बेस्ट यंग अचिव्हर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 येथील युवा रांगोळीकार व चित्रकार कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी मार्च महिन्यात आपल्या अजय पाटील, अजय विसपुते, वैभव शिंपी, शुभम पाटील या सहकाऱ्यांसोबत थेट महाराष्ट्र राज्या बाहेर जाऊन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविथा अक्का यांच्या वाढदिवसानमित्त हैदराबाद येथे ६० बाय ४० फुटाच्या आकाराची भव्य अशी पोट्रेट रांगोळी काढली होती. 

त्याच कलाकृतीची नोंद थेट महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. तसेच आतापर्यंत विविध ठिकाणी रांगोळी प्रात्यक्षिक, एकल  तसेच समूह रांगोळी कलेमध्ये त्यांनी १०० च्या वर पोट्रेट, अनामोर्फिक, थ्रीडी विविध प्रकारच्या रांगोळी कला साकारल्या असून त्यामध्ये विविध थोर पुरुष व सामाजिक विषयांचा समावेश आहे. युवा रांगोळीकार व चित्रकार शैलेश कुलकर्णी यांनी रांगोळी कलेतून आपले नाव घडविले आहे. त्यांना आतापर्यंत बरेच राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय बक्षिसे मिळाली आहेत. नुकताच मागील महिन्यात त्यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या तर्फे रांगोळी कलेबद्दल बेस्ट यंग अचिव्हर पुरस्कार मिळाला आहे. 

या विक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करतांना मला नेहमीच कलारसिक म्हणून साथ देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, तसेच माझे पुढील ध्येय गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करणे हे असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाचोरा शहरातून तसेच सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Protected Content