केंद्रीय समितीने केली प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या संसर्गाबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जळगावात आलेल्या केंद्रीय समितीने आज शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाबाबत करण्यात येणार्‍या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जळगावात केंद्रीय समिती आलेली आहे. या समितीने आज शहरातील कौतिक नगर भागातील प्रतिबंधीत परिसराची पाहणी केली. प्रशासनातर्फे या भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. याप्रसंगी समितीच्या सदस्यांसह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, इन्सीडेंट अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण आदींची उपस्थिती होती. ही समिती आज विविध उपाययोजनांचा आढावा घेऊन बैठक देखील घेणार आहे.

Protected Content