जळगावात मेहरूण तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । मित्रांसोबत मेहरूण तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम कैलास चव्हाण वय 12 रा. सिध्दार्थ नगर, रामेश्‍वर कॉलनी हा नववीत शिकणार मुलगा आईने काकूकडे आलेले नातेवाईकांना बोलावून ये असे सांगितल्यानंतर तो काकूकडे आलेल्या नातेवाईकांना बोलावून परत घरी आला. त्यानंतर तो आपल्या 3-4 मित्रांसोबत मेहरूण तलावावर पोहण्यासाठी गेला. दरम्यान तो बुडाल्याची माहिती मित्रांनी नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गौतमला पाण्याबाहेर काढले,व तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. वडील कैलास प्रल्हाद चव्हाण हे सेंटींगचे काम करतात तर आई सरला या गृहिणी आहे. मयत गौतमला दोन भाऊ आहे. मेहरुणमधील जयदुर्गा माध्यमिक विद्यालयाचा गौतम विद्यार्थी आहे. असून आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. मेहरुण तलाव यावर्षी तुडूंब भरला आहे. यापूर्वीही अनेकदा, याठिकाणी अनेक जण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरण एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content