जिल्ह्यात विक्रमी लसीकरण; एकाच दिवसात ५३ हजार डोस !

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांनी एकाच दिवसात ५३ हजार लसींचे डोस देण्यात आले असून हा आजवरचा उच्चांक ठरला आहे.

जळगाव जिल्ह्यातील लसीकरणाला आता वेग आल्याचे दिसून येत आहे. खरं तर लसींचा नियमीत पुरवठा होत नसतांनाही आलेल्या लसीच्या साठ्यांमधून विविध केंद्रांना योग्य प्रकारे वाटप करण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागत आहे. अनेक केंद्रांवर नियोजनाचा अभाव दिसत असला तरी मुळातच लसींचा साठा हा मर्यादीत स्वरूपात येत असल्याने हा गंभीर मुद्दा मानता येणार नाही. या पार्श्‍वभूमिवर, जिल्हा प्रशासनाने एकाच दिवसात तब्बल ५३ हजार लसींचे डोसेस देऊन नवीन विक्रम स्थापीत केला आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात ३१३६६ लोकांनी लसीचा पहिला तर २१७२३ जणांनी दुसरा डोस घेतला. याचा एकत्रीतपणे विचार केला असता काल दिवसभरात तब्बल ५३०८९ इतक्या स्त्री-पुरूषांनी कोरोना प्रतिकारक लस घेतली. आजवरचा हा एकाच दिवसातील लसींचा उच्चांक आहे. कालच देशभरात एक कोटींपेक्षा जास्त लसींचा विक्रम स्थापीत झाला असतांनाच जिल्ह्यातही लसींचा विक्रम झाल्याची बाब लक्षणीय आहे.

Protected Content