तरूणाचा मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ईच्छादेवी चौक ते रिलायन्स पेट्रोलपंपदरम्यान रस्त्यावर पडलेला तरुणाचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे, या प्रकरणी रविवार, २ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव शहरातील मिर्झा साहील बेग अजिज बेब वय १९ हा तरुण १ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरात आला होता. यादरम्यान रात्री १० वाजेच्या सुमारास ईच्छादेवी चौक ते रिलायन्स पेट्रोलपंपादरम्यान मिर्झा याचा मोबाईल रस्त्यावर पडला. मोबाईल रस्त्यावर पडल्याचे लक्षात आल्यावर मिर्झा याने जावून घटनास्थळी पाहणी केली असता, मोबाईल मिळून आला नाही, मोबाईल कुणीतरी चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर अखेर मिर्झा याने याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इमरान सैय्यद करीत आहेत.

 

Protected Content