नवरात्रोत्सवानिमित्त एकता ग्रुपने दिला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील संजय नगर परिसरातील एकता ग्रुप दुर्गा देवी मंडळातील सर्व सदस्यांना एक सुखद अनुभव आला.

सध्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. अशा प्रसन्न वातावरणात आणि हिंदू धर्मातील पवित्र नवरात्रोत्सवानिमित्त मुस्लिम परिवाराची साथ मिळाली तर त्याहून मोठा दुग्धशर्करा योग असूच शकत नाही. काल सायंकाळी देवी मातेची आरती झाल्यानंतर जो प्रसाद वाटप करण्यात येतो. तो प्रसाद मुस्लिम परिवाराने तयार करून दिला. एकता ग्रुप संजय नगर मंडळातील देवीची आरतीचा प्रसाद मुस्लिम परिवारातर्फे देण्यात आला.

यावेळी या परिवारातील शेख नुरुद्दीन गफ्फार, शेख नसरिन शेख नुरुद्दीन, शेख जुनेद शेख नुरुद्दीन, शेख कामरान शेख नुरुद्दीन यांनी संजय नगर एकता चौक मित्र मंडळाच्या सदस्यांजवळ प्रसाद सुपूर्द केला. यावेळी उपस्थित सर्व एकता ग्रुपचे सदस्य राहुल चौधरी, रविंद्र महाजन, मोनू महाजन, भुषण पाटील, सुनिल पाटील, सागर महाजन, संजय मोरावकर, भुषण महाजन, अमोल चौधरी, मयुर मोरावर, विकास मोरावकर, विजय पाटील, ओम मोरावकर, अमन मोरावकर, दिपक भोई, दिपक चौधरी, अमोल धुंदेकर, दिपक पाटील, शांताराम पाटील, मिलिंद शिरसाठ, हेमंतभाऊ महाजन, राज परदेशी, राहुल धोबी, राजु चौधरी, अक्षय मोरावकर, गणेश निकम आदी सर्व परिवार उपस्थित होते.

Protected Content