राहुला गांधी यांचे मोदींना चार प्रश्न

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनायोद्धे आणि आरोग्यसेवकांचे प्राधान्याने लसीकरण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुला गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चार प्रश्न विचारले आहेत.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी देशाला हे नक्की सांगायला हवं की – . सर्व करोना लशींपैकी भारत सरकार कोणती निवडणार व का? . लस पहिल्यांदा कोणाला मिळणार व वितरण धोरण काय असेल? . लस मोफत उपलब्ध व्हावी यासाठी पीएम केअर फंडचा वापर केला जाईल का? . सर्व भारतीयांना कधीपर्यंत लस दिली जाईल?
लशीच्या आणीबाणीकालीन वापराला परवानगी देण्याची आणि त्यासाठीच्या कार्यपद्धतीची शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहात आहे.

Protected Content