मोठी बातमी : अजितदादांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राष्ट्रवादीतील फुटीनंतर वातावरण तापले असतांनाच आज अजित पवार यांनी आपल्या सर्व मंत्री सहकार्‍यांसह शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आज पुन्हा ते पवारांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोबत्यांसह यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेले आहेत.

 

त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content