आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन

 

गुवाहाटी : वृत्तसंस्था । आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. ८४ वर्षीय तरुण गोगोई काही दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित आढळले होते.

त्यांच्यावर गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं होतं.

माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या प्रकृती बिघडल्याचं समजल्यानंतर आज सकाळीच आसामचे सद्य मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले होते. ताबडतोब ते डिब्रुगडहून गुवाहाटीकडे रवाना झाले. खुद्द ट्विट करून त्यांनी याबद्दल माहिती दिली होती.

 

तरुण गोगोई हे नेहमीच माझ्यासाठी एका पित्यासमान राहिलेत. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांमध्ये मीदेखील सहभागी होतोय, असं ट्विट सर्बानंद सोनोवाल यांनी केलं होतं.

Protected Content