इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं – अशोक चव्हाण

मुंबई- ओबीसी आरक्षण कायम राहील, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं ही आमची भूमिका असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा सरकारची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षण कायम राहील. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं ही आमची भूमिका असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधिशांनी हे सूतोवाच केल्याची माहितीदेखील अशोक चव्हाण यांनी दिली आहे. घटनापीठाची तातडीने स्थापन करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज सोमवारी २ नोव्हेंबर रोजी याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. आरक्षणाच्या मुद्यावरुन विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Protected Content