अनिल देशमुखांना ईडीचे तिसरे समन्स

मुंबई प्रतिनिधी | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने चौकशीसाठी समन्स बजावत ५ जुलै रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अनिल देशमुख यांना ईडीने दोनदा समन्स बजावलं होतं. आधी त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचं कारण देऊन ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. नंतर त्यांनी सात दिवसाची मुदत मागवून घेतली होती. येत्या सोमवारी ५ जुलै रोजी त्यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे ईडीने आज त्यांना समन्स बजावलं असून सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर, दुसरीकडे तिसर्‍यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. देशमुख दिल्लीत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून कायदेशीर बाबींबाबत सल्ला घेणार आहेत. तसेच ते सर्वोच्च न्यायालयातही धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच ते सुप्रीम कोर्टान धाव घेण्याची शक्यता देखील आहे.

Protected Content