बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात; भाजपचा आक्रमक पवित्रा

चिंचवड | राज्य शासनाचे निर्देश मोडून पायी वारी करण्यासाठी निघालेले बंडातात्या कराडकर यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या सुटकेसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राज्य शासनाने यंदा देखील कोविडच्या आपत्तीमुळे पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीची मागणी केली होती. मात्र करुणा महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकर्‍यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी त्या वारकर्‍यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी वारीचा निर्धार कायम ठेवल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघी जवळच्या संकल्प या मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकर्‍यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. मात्र काही ज्येष्ठ वारकरी पायी वारीसाठी ठाम असल्याने आता यावरून संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी त्यांची भेट घेतली आहे. येथे भाजपचे पदाधिकारी जमले असून त्यांनी ठिय्या आंदोलनाची तयारी केली आहे. यामुळे या अटकेवरून आता संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content