बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून अभिवादन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा येथील मोठा आड सुभाष चौक परिसरात शिवसेनाप्रमुख हिंदूहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून श्री स्वामीनारायण मंदिराचे पुजारी सत्यप्रकाश स्वामी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख धनंजय चौधरी, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद पाटील, शहर प्रमुख भरत नेहते, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख योगिता वायकोळे, पुजा बेंडाळे, माजी नगरसेवक श्याम पाटील, शहर सचिव शरद भारंबे, उपशहर प्रमुख दिगंबर महाजन, डॉ. अजितकुमार पाटील, यशवंत भंगाळे, अतुल नेहते, डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रमोद कुरकुरे, निलेश खाचणे, संजय बेंडाळे, दीपाली नेहते, वैशाली भारंबे, पल्लवी चौधरी यांच्यासह परिसरातील महिला शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

यानंतर देशमुख वाडा मधील बॅरिस्टर देशमुख बालक मंदिरात लहान मुलांना खाऊ वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला. यावेळी महिला आघाडी, प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content