राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे उद्या लक्षवेध दिन

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने गुरुवार २७ जून रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये लक्षवेध दिन पाळण्यात येणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा राजपत्रित अधिकारी समन्वय समितीमार्फत देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, आश्‍वासित प्रगती योजनेतंर्गत बढतीच्या लाभासाठी घालण्यात आलेली वेतनमर्यादा, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे आदि मागण्या अद्याप शासनाकडे प्रलंबित आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महासंघातर्फे लक्षवेध दिन पाळण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात २७ जून रोजी सकाळी ११.०० वाजता राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी जळगाव जिल्ह्यातील राजपत्रित अधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा राजपत्रित अधिकारी समन्वय समितीमार्फत करण्यात आले आहे.

Protected Content