हिंगोणा येथे घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य

IMG 20190626 WA0035 1

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथे महिलांचे शौचालयाची दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.  शौचालय बांधल्यापासून तर आज पर्यंत ते शौचालय स्वच्छ न झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावात साफ सफाई अभियान नावापुरताच करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. स्वच्छालय बांधल्यापासून ते आतापर्यंत स्वच्छ करण्यात आलेले नाही आहे. वार्ड क्र. 5 मधील महिलांना  शौचालयात दुर्गंधी असल्यामुळे त्यांना उघड्यावर शौचालयास जावे लागत आहे व बाजूलाच मराठी मुलींची शाळेच्या आवारातील अडोखात शौचालयास बसत असल्यामुळे शाळाही ज्ञानदानाचे मंदिर असून त्याठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. म्हणूनच, ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. तसेच गटारी स्वच्छ नसल्यामुळे डास निर्माण होत असून, त्याच बरोबर ठीकठिकाणी घाणीचे ढीग दिसत आहेत. तसेच आता पावसाला सुरुवात होण्याआधी या युद्ध पातळीवरील स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Protected Content