प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सत्कार

यावल प्रतिनिधी | येथील नगर पालिकेत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने प्रामाणिकपणे आपली कार्य करत आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या दिव्यांग बांधवांचा सत्कार कण्यात आला.

यावल नगर पालिकेत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने पालिकेची पूर्ण वेळ नोकरी सांभाळून दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांनबाबत सतत मार्गदर्शन करणारे दिव्यांग कर्मचारी मोहन सोनार यांना पालिकेचे गटनेते माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

यावेळी यावल शहरातील इतर दिव्यांग बांधव शेख अस्लम मोमीन, सिकंदर बिस्मिल्ला पटेल, दिनकर चौधरी, शकील रफिक खान, इस्माईल शेख वजीर, किरण सुरवाडे, सुरेश कोळी यांचाही याप्रसंगी गुलाबपुष्प देऊन कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. सर्व दिव्यांग बांधवांना जगातिक दिव्यांग दिनानिमित्त नगराध्यक्षा नौशाद तडवी, नगरसेवक राकेश कोलते, समीर शेख मोमीन यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मागील वर्षाप्रमाणे देखील शासन नियमानुसार नगरपरिषदेच्या उत्पन्नातुन 5% निधीची रक्कम शहरातील सर्व दिव्यांगांच्या बँक खात्यामध्ये वितरीत केली जाईल असे आश्वासन यावेळी यावल नगरपालीकेचे गटनेते अतुल पाटील यांनी दिले.

मागील वर्षी नगराध्यक्षा नौशाद तडवी व तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या हस्ते यावल शहरातील २४१ दिव्यांग बांधवांना ५% निधीची रक्कम सुमारे साडेचार लाखाचे धनादेश वितरित करण्यात आले होते. त्यासाठी अतुल पाटील व राकेश कोलते यांनी सातत्याने सर्वसाधारण सभेत पाठपुरावा केला होता.

याप्रसंगी यावल नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक राजेंद्र देवरे, बांधकाम अभियंता योगेश मदने, सइद शेख, स्वप्नील म्हस्के, लेखापाल नितीन सुतार, लेखापरीक्षक, शरद पाटील, लिपिक शिवानंद कानडे, सुनील उंबरकर, रविंद्र काटकर, रवींद्र बारी, मधुकर गजरे, राजेंद्र गायकवाड, सचिन तायडे, असद उल्ला खान, मुकेश गजरे, नितीन पारधे, रफिक अरब, अनिल चौधरी, अमोल शिंदे, कैलास काटकर, आकाश सोनवणे, दादू धोत्रे, रमेश पवार, संतोष नन्नावरे, अर्चना देशमुख आदी. कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content