जळगावात बारी समाजाचे भव्य अधिवेशन उत्साहात


जळगाव (प्रतिनिधी) येथे सकल बारी समाज विकास परिषद आयोजित “अखिल भारतीय बरई-तांबोळी-चौरसिया-कुमरावत, बारी समाजाचे भव्य शतकीय अधिवेशन आज उत्साहात पार पडले.

अधिवेशनाचे उद्घाटन लोकनेते तथा मा महसूल-कृषीमंत्री मा.आ.एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री रामदास बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खा. डॉ.उल्हासराव पाटील, माजी आ.शिरीष चौधरी, शेखर पाटील (पं. समिती सदस्य यावल), बारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश घोलप, उत्तरप्रदेश बसपाचे प्रदेश सचिव अनुप बारी, नाळ या मराठी चित्रपटातील बाल अभिनेता चि. श्रीनिवास पोकळे, श्रीमती सिमाताई डोबे (नगराध्यक्षा- जळगाव जामोद) , श्रीमती प्रतिभाताई बोडके (नगराध्यक्षा सोयगाव जि. औरंगाबाद), कमलकांत लाडोळे (नगराध्यक्ष अंजनगाव सुरजी जि.अमरावती), श्रीमती विजयाताई कलसे (नगराध्यक्षा शेंदुर्णी, जि.जळगाव), अधिवेशनाचे कार्याध्यक्ष मनोज बारी, पुंडलीक बारी, तसेच इतर मान्यवर व सकल बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here