खराब रस्त्यांच्या निषेधार्थ कॉंग्रेसची गांधिगिरी : अधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार

धरणगाव प्रतिनिधी | सध्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था अतिशय खराब झालेली असल्याने याची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतरही अधिकारी न भेटल्याने कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला निषेध व्यक्त केला.

याबाबत वृत्त असे की, सध्या चोपडा ते धरणगाव या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यावर दररोज तीन ते चार अपघात होत आहेत. या संदर्भात कॉंग्रेसचे पदाधिकारी चंदन पाटील हे गेल्या काही दिवसांपासून तक्रार करण्यासाठी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या कार्यालयात येत असले तरी येथील अधिकारी श्री. ठाकूर हे त्यांना मिळत नाहीत.

गेल्या चार-पाच दिवसांपासून हा प्रकार घडत असून आज कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी श्री. ठाकूर यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरीच्या माध्यमातून त्यांचा निषेध केला. चोपडा रस्ता तातडीने दुरूस्त करण्याची मागणी देखील चंदन पाटील यांनी याप्रसंगी केली. या संदर्भात आपण मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्डे न बुजल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील याप्रसंगी त्यांनी दिली. तर अधिकारी ठाकूर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी तातडीने खड्डे बुजण्याचे आश्‍वासन दिले.

या गांधीगिरी आंदोलनात कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील यांच्यासह सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोळे, गोपाल पाटील, युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल मराठे, योगेश येवले व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content