भाजपशी युती हाच पर्याय ! : खेडेकरांची भूमिका

मुंबई प्रतिनिधी | आजवर संघ विचारधारेचा विरोध करणारे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी यापुढे भाजपशी युती हाच पर्याय असल्याचे मत मांडल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. यामुळे संभाजी ब्रिगेड भाजपसोबत युती करणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे आता भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून येतंय.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली.

खरं तर पुरूषोत्तम खेडेकर यांनी आजवर संघ-भाजपचा विरोध केला आहे. मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही आरएसएस विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Protected Content