Home Cities भडगाव भडगाव येथील विकास महाजन यांची भाजपा युवा मोर्चात जिल्हा उपाध्यक्षपदी निवड 

भडगाव येथील विकास महाजन यांची भाजपा युवा मोर्चात जिल्हा उपाध्यक्षपदी निवड 

0
108


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।   भाजयु युवा मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची नवीन जाहीरात नुकतीच करण्यात आली असून, भडगाव येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विकास सुरेश महाजन यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विकास महाजन हे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व असून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्य यामुळे अल्पावधीतच त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योजक म्हणूनही त्यांची ओळख ठळक असून, भडगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध हॉटेल गायत्री भोजनालयाचे ते संचालक आहेत.

सामाजिक व संघटनात्मक कारकीर्द त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक म्हणून सुरू झाली. संघामध्ये कार्य करताना त्यांनी विविध स्तरांवरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. भारतीय जनता पक्षामध्येही त्यांनी युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीस म्हणून प्रभावी कार्य केले आहे. तालुका तसेच जिल्हास्तरावर संघटन बळकटीसाठी केलेले त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

सामाजिक क्षेत्रातही विकास महाजन सक्रिय आहेत. माळी समाजाच्या हितासाठी त्यांनी महाराष्ट्र माळी महासंघाच्या अध्यक्षपदासह जिल्हा उपाध्यक्ष यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चाने त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.


Protected Content

Play sound