पाचोऱ्यात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उद्या २१ रोजी गुरुवारी भव्य व मोफत आरोग्य तपासणी शिबिर व उपचाराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भिमाशंकर जमादार यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे, विघ्नहर्ता मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील), डॉ. सागर गरुड, डॉ. योगेश सोनवणे, डॉ. पंकज नानकर, डॉ. अमित वाघ, डॉ. राहुल पटवारी, डॉ. विजय पाटील व जळगांव येथील गोदावरी हॉस्पिटलची तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची टिम विविध आजारांची तपासणी व निदान करणार आहेत.

पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबीरात हृदयरोग, मधुमेह, मेंदुरोग, रक्तदाब, फुफूसाचे आजार, त्वचारोग, मोतिबिंदू, नाक, कान, घसा, रक्त लघवी तपासणी, महिलांचे आजार व लहान बालकांचे आजाराची तपासणी केली जाईल व गरज लागल्यास जीवनदायी आरोग्य योजनेचा खाजगी रुग्णालयात उपचार केला जाणार आहे. शिबीरात येतांना रुग्णांनी स्वतःचे दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड सोबत आणने गरजेचे आहे. आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले आहे.

 

Protected Content