पाचोरा नगरपालिकेच्या मासिक सभेत समस्यांचा वर्षाव (व्हिडीओ)

p11

पाचोरा प्रतिनिधी । नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या. या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. तसेच तक्रारींकडे नगर पालिकेने दुर्लक्ष न करता ते कायम स्वरुपासाठी सोडव्यावा अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. ही सभा पाणी, रस्ते, गटारी व स्वच्छता या मुद्यांवर सभा गाजली.

याबाबत माहिती अशी की, बदलत्या वेळेनुसार अधिका-यांनी आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी. सर्वसामान्य नागरिकांना येणा-या समस्यांच्या तक्रारींकडे दूर्लक्ष न करता त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावा. तसेच शौचालय किंवा घरकुलांच्या लाभार्थ्यांना शासननिर्णय प्रमाणे अतिक्रमण जागा त्याच्या नावे लावण्यात यावे. पावसाळयाच्या दिवसांमध्ये नागरिकांना पायी चालण्यास अडचणी निर्माण होतात. विविध भागात व्यवस्थित रस्ते, गटारी नसून, त्या गटारी वेळोवेळी स्वच्छ केल्या जात नाही. इतरत्र समस्याकडे लक्ष दिले जात नाही, व देणार कोण ? असे विविध तक्रारींचे प्रश्न नगरपालिकेत मांडण्यात आले आहे.
यावेळी, राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ म्हणाले की, अधिका-यांनी सामान्य नागरिकांच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच प्रशासन हे सर्व सामान्य नागरिकांच्या सेवेसाठीच आहे. हे लक्षात असू द्यावे असा इशारा अधिका-यांना देण्यात आला आहे. यावेळी मासिक सभेत नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सुनीता पाटील, सतीश चढे, राम केशवानि, दादा चौधरी, विकास पाटील, संगीता पगारे, मालती हटकर, शरद पाटील सह सर्व नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Protected Content