अभिव्यक्तीवर स्वातंत्र्यावर घाला – राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – महाविकास सरकार गठन होत असताना गृहविभागाकडून फोन टॅपिंग केले गेले असून, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.

२०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन महाविकास आघाडी सरकारचे गठन होत होते. त्याच वेळी दुसरीकडे नाना पटोले, खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचे सांगत फोन टॅप करण्यात आले होते. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचे सांगितले गेले होते. आणि एकनाथ खडसे यांचा फोन ६७ तर संजय राऊतांचा फोन ६० वेळा टॅप करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पत्रातून ही माहिती उघड झाली असल्याचे खा. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

Protected Content