पाचोरा येथील तरूणाने संपविली जीवनयात्रा; कारण गुलदस्त्यात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका होतकरु २५ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावत आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना सकाळी उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत असलेले अनिल बागुल (वय – २५) रा. जवाहर हौसिंग सोसायटी या होतकरु तरूणाने रविवारी १४ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सदरचा प्रकार बाजुच्या खोलीत असलेल्या त्यांच्या परिवाराच्या लक्षात येताच परिवारातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला.

परिवाराच्या सदस्यांनी अनिल बागुल यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी अनिल बागुल यांना मृत घोषित केले. घटनेबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अनिल बागुल यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे अनिल बागुल यांनी आत्महत्या का केली ? या मागील कारण अद्याप समजू शकले नाही.

 

Protected Content