पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथे गुरुवार, दि.२९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हिस्र प्राण्याने शेळी पालन करणाऱ्या शेळी मालकाच्या गावापासून केवळ २०० फुटी अंतरावर असलेल्या चार शेळ्या व एक मेंढी फस्त केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे शेळी पालकांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेळी पालक घटनास्थळी येताच ढसाढसा रुडू लागला. बोदर्डे शिवारात साहेबराव घुडकू पाटील या शेतकऱ्यांचे गोठाशेड असून या शेडमध्ये संजय कोळी यांच्या चार शेळ्या व एक मेंढी बांधलेली असतांनाच रात्री तो घरी आल्यानंतर रात्री बारा बाजेच्या सुमारास अज्ञात हिस्र प्राण्याने शेळ्या व एक मेंढी अर्धवट फाडून ठार केल्या त्यात त्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
शेळी पालक सकाळी सात वाजता गोठाशेडकडे गेला असता घटना पाहून त्यास अश्रू अनावर झाले होते. घटनास्थळी ग्रामसेवक कृष्णा पाटील, पोलीस पाटील दिपक पाटील यांनी भेट दिली. चाळीसगांव विभागाच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. अज्ञात हिस्र प्राणी लांडगा असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.