ग्राहक व विमा प्रतिनिधींच्या मागण्यांसाठी एल.आय.सी. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील एल.आय.सी. शाखेत एल.आय.सी. ग्राहक व विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यासाठी आज शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

विमा प्रतिनिधींनी पॉलिसीधारकांना बोनस वाढला पाहिजे, कर्जाचे आणि लेट फीचे व्याजदर कमी करा, कमी करा, विमा हप्ता वरील जी.एस.टी. मागे घ्या, विमा प्रतिनिधींच्या साठी वेलफेअर फंड तयार करा – तयार करा, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅच्युइटीमध्ये वाढ झाली पाहिजे झालीच पाहिजे, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढवून द्या, विमा प्रतिनिधींना न्याय आणि प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळालाच पाहिजे,विमा प्रतिनिधींना पेन्शन मिळालीच पाहिजे, विमा प्रतिनिधींना भविष्य निर्वाह निधी लागू करा – लागू करा या सह विविध मागण्यांसाठी विमा प्रतिनीधींनी पाचोरा येथील एल.आय.सी. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.

 याप्रसंगी विमा प्रतिनीधी नितीन मोराणकर, शांताराम चौघरी, विनायक दिवटे, प्रकाश पाटील, आर.वाय.पाटील, सुनील देवरे, अनिल कोतकर, सुजित तिवारी, अविनाश सिनकर, आनंदा पाटील, वृंदा गंभीर, चंद्रकांत पाटील, मिलिंद येवले, पुंडलिक वाणी, तुषार येवले, प्रमोद चिंचोले, निलेश सिनकर, बापू कासार, स्मिता संजय वाणी, पंडित शेवाळे, तिलक भांडारी, रविंद्र पाटील, रोहित नाथानी, देविदास कोळी यासह विमा प्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content