अमळनेर येथे ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध ( व्हिडीओ )

755e9978 7302 45d0 9521 1788f9bca4a7

अमळनेर (प्रतिनिधी) उठी उठी गोपाळा, माझे माहेर पंढरी, किती सांगू मी सांगू तुम्हाला, ए मेरे वतन के लोगो, केशवा माधवा, अशा एकापेक्षा एक सुरेल गीतांनी येथील सुप्रसिद्ध गायक देवर्षी गुरव यांनी शिवाजी उद्यानात पार पडलेल्या ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध शहनाई वादक संजय गुरव यांनी शहनाई वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढविली.

शहरात विविध उपक्रमामुळे नव्यानेच प्रकाशझोतात आलेला श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुप व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ,(संघटना) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.६) गुढी पाडव्याला ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात निसर्गरम्य वातावरणात प्रथमच असा कार्यक्रम झाल्याने त्यास महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. पहाटे ५.०० वा कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ललित मोमाया व सौ. स्नेहल मोमाया यांच्या हस्ते गुढी पूजन तर माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमात येथील प्रसिद्ध शहनाई वादक संजय गुरव व सध्यस्थितीत सुमधुर आवाजामुळे अत्यंत प्रसिद्धी झोतात असलेला व काळजाचा ठेका चुकविणारा गायक देवर्षी गुरव यांच्या ग्रुपने उत्कृष्ट सादरीकरण केले. सर्वप्रथम ‘प्रथम तुला वंदितो’ ही गणेश वंदना शहनाईद्वारे सादर करण्यात आली. यानंत देवर्षी याने शोधिसी मानवा, चिठी आयी है…देश भक्ति, वासुदेव आला, या जन्मावर या जगण्यावर, आजी सोनियाचा दिनु, बाजाराला विकण्या निघाली, आदी एकापेक्षा एक सदाबहार गीते तसेच गवळण, भूपाळी, भावगीते सादर करून पहाटेच्या गारव्यात सुखद असा आनंद दिला. दिलीप साळुंखे यांनी उत्कृष्ट अँकरिंग करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या ग्रुपमध्ये कलाकार तबला सूचित गुरव,ऑक्टोपॅड मिहिर गुरव,बाल कलाकार तरुण गुरव,ढोलक भगवान घोलप, साउंड ऑपरेटर चंद्रकांत गुरव, किरण गुरव आदींनी साथ संगत दिली. श्रोत्यांमधून देखील काहींनी बासरी वादनासह गीते सादर केली.

यावेळी ग्रुपमधील असंख्य बोहरी व मुस्लिम समाज बांधवांनीही सहभाग घेतल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संजय चौधरी यांची तेली पंच मंडळाच्या अध्यक्षपदी तर प्रितपाल बग्गा यांची रेल्वेच्या झेड.आर.यू.सी.सी. कमिटीवर नियुक्ती झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. उद्यानात योग शिबिर घेणारे पतंजलीचे जळगाव जिल्हा योग प्रचारक कमलेशजी आर्य व ग्रुपसाठी थायरॉईड शिबिर घेणारे शरद शेवाळे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, संचालक योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, अर्बन बँक संचालक पंकज मुंदडा, डॉ. निखिल बहुगुणे, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. संजय चव्हाण, डॉ. सौ. अंजली चव्हाण, डॉ. सौ. हिरा बाविस्कर, डॉ. मिलिंद नवसारीकर, मनोज भामरे, माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर, अर्बन बँकेचे माजी चेअरमन मुन्ना शर्मा, अजय केले, डॉ. संजय शाह, डॉ. संदीप सराफ, अॅड. महेश बागुल, पत्रकार किरण पाटील, सुरेश झाबक, प्रकाश पारख, रमेश जीवनांनी, भरत कोठारी, अॅड. सुशील जैन, पर्यंक पटेल, सौ. उज्वला शिरोडे यांच्यासह ग्रुप सदस्य व पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले तर अ. भा. मारवाडी महिला मंचच्या अध्यक्षा सौ. ज्योस्तना जैन व सदस्यांनी त्यांना सहकार्य केले.

Add Comment

Protected Content