बळीरामपेठेतून मोटारसायकल लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठ येथील तहसील कार्यालय समोरून २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेठ इसरार अहमद माजिद शेख (वय ४२) रा. संभाजी चौक शिवाजीनगर हा कामाच्या निमित्ताने १३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता बळीराम पेठ येथील तहसील कार्यालयासमोर आले होता. त्यावेळी त्यांनी मोकळ्या जागेत २० हजार रुपये किमतीची मोटरसायकल (एमएच १९ बीटी २६६६) पार्किंगला लावली होती सायंकाळी साडेचारच्या सुमारास काम आटोपून पुन्हा जवळ गेले असता दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध केली, परंतु मोटारसायकल न मिळाल्यामुळे शहर पोलीस ठाण्यात शेख निसार अहमद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटा वर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संतोष खवले करीत आहे.

 

Protected Content