यावल येथील रोजंदारी कर्मचारी तात्काळ मानधन मिळण्याबाबत निवेदन

यावल प्रतिनिधी । येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळा आणि वस्तीगृहात कार्यरत रोजंदारी तासिका कर्मचारी वर्ग ३/४ यांनी अनेक वर्षापासुन अल्प मानधनात सेवा प्रदान केलेली असुन मागील शैक्षणिक सत्र २०२० व २१ मधील आदेश निर्गमित करून तात्काळ मानधन मिळावे, या मागणीसाठी आज शिक्षकांच्या शिष्ठ मंडळाने आ.शिरीष चौधरी यांची भेट घेवुन त्यांना निवेदन सादर केले.

दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा ईशारा देण्यात आला असुन , आज एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालय ठिकाणी या मागणी संदर्भात आश्रमशाळा रोजंदारी शिक्षकांनी रावेर यावल चे आमदार शिरीष चौधरी यांना दिलेल्या मागणीच्या निवदनात म्हटले आहे की , एकात्कीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत शासकीय शाळा आणी वस्तीगृहामध्ये कार्यरत रोजंदारी तासीका कर्मचारी वर्ग३ / ४ यांनी अनेक वर्ष अल्प मानधनात सेवा प्रदान केली आहे. तसेच कोरोना संकटाच्या परिस्थितीत आदीवासी विकास विभागाने अनलॉक लर्निंग उपक्रम व शिक्षण सेतु उपक्रम सुरू केलेला असुन त्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी  गुणवत्ता वाढविण्यासाठी कर्मचारींना हजर करून घेणे संयुक्तीक होते. तरीही कार्यालया मार्फत कुठलीही प्रक्रीया राबविली नाही. दि.२२ रोजी आदीवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांची आढावा बैठकीनंतर भेट घेतली असता रोजंदारी तासीका कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली.

त्यावर लगेच आयुक्तांनी तात्काळ शाळेवर व वस्तीगृहावर हजर करून तात्काळ आदेश निर्गमित करून घेण्याचे प्रकल्प अधिकारी यांना सुचित केले आहेत . त्यावर कार्यालयाने विद्यार्थी संखेच्या संहितेवर कर्मचारी हजर करण्याचे परिपत्रक निर्गतित केले. मुख्याध्यापकांनी प्रस्ताव कार्यालयास पाठविले तरीही जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकी दरम्यान मानधाना संदर्भात प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला प्रकल्प अधिकारी निर्देशित करण्याचे आदेशीत केले असता, आज ऑगस्ट महिन्याचा शेवटा आठवडा येत असुन देखील सुद्धा रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्याप तरी न्याय मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे असुन , तसेच सन२०२१व२२चे शैक्षणिक सत्र मध्ये अजुन ही कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे कामावर हजर करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे सामान्य रोजंदारीवर कर्मचारी म्हणुन मागील दोन वर्षापासुन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे . या सर्व प्रकारामुळे रोजंदारी कर्मचारी हाताष झालेला आहे. 

तरी शासनाने याची काळजी घेवुन तात्काळ गोरगरीब रोजंदारी वरील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अन्यथा दि.२४ / ८ / २०२१ मंगळवार या दिवशी कोरोनाचे काटेकोर नियम पाळुन यावल येथील एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्पच्या जिल्हा कार्यालया  समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जितेन्द्र गुरव , जब्बार तडवी , ए आर पावरा , वृक्षाली सोनवणे , याकुब तडवी , सुलेमान तडवी यांच्यासह रोजंदारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या संदर्भात आ. शिरीष चौधरी यांनी संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण आपल्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पहोचवु असे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले . याप्रसंगी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जनहित विभाग चेतन अढळकर ही उपस्थित होते .

 

Protected Content