शहरी व ग्रामीण रेशन दुकानदारांनी संपात सहभागी न होता प्रशासनास सहकार्याची दिली ग्वाही (व्हिडीओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी– सरकार मान्य स्वस्त धान दुकानदार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज १ एप्रिलपासून संपावर जात आहेत. रेशन लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जळगाव शहर व तालुका रेशन दुकान संघटनांनी रेशन दुकानातील संपात सहभागी न होता जिल्हाधिकारी अभिजित राउत न्याय्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉज मशीन संदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत ई पॉज मशीन सरकार जमा करण्याचे यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार आज शुक्रवारी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने ई-पॉज मशीनची प्रेतयात्रा काढत न्याय्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच  सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर असो, पुणे संलग्नित जळगाव शहर व तालुका रेशन दुकान संघटनां सहभागी न होता, शहरी व ग्रामीण सरकारमान्य रेशन दुकानदार संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रभारी अध्यक्ष अनिल अडकमोल, कार्याध्यक्ष नवनाथ दारकुंडे, रत्नमाला काळून्खे, लताबाई तिवारी, मंगला बारी, नंदा सपके , दीपक परदेशी, रमजान मुलतानी, दीपक पाटील, सुभाष जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1261083191084305

 

Protected Content