रिक्षा उलटल्याने प्रवाशी जखमी; रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडकोतील तरुण घरी जाण्यासाठी रिक्षात बसला. रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षाचा अपघात झाला. यात रिक्षातील प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातल रहिवासी शंकर भिमराव सोनवणे (वय ३०) व विशाल युवराज शिरसाळ (वय १९) हे दोघ एमएच १९ सीडबल्यू ३२९८ क्रमांकाच्या रिक्षाने घरी जात होते. प्रल्हादनगर जवळील उतरती जवळ रिक्षाचालकाने रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटून अपघात झाला. यात रिक्षातील दोघे प्रवासी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकरणी प्रवासी शंकर सोनवणे यांच्या तक्रारीवरुन रिक्षाचालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अनमोल पटेल हे करीत आहे.

Protected Content