मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बेकायदेशीर फोन टॅपींगसह मनी लॉंड्रींग आणि अन्य प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने संजय पांडे यांना समन्स बजावले होते. त्यांनी ईडीने कसून चौकशी केली होती. यानंतर त्यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर छापे देखील मारण्यात आले होते. या अनुषंगाने त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत मिळाले होते.
दरम्यान, आज सायंकाळी ईडीने संजय पांडे यांना अटक केल्याचे वृत्त आहे. बेकायदेशीर फोन टॅपींग तसेच मनी लॉंड्रींगसह अन्य प्रकरणांमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. या माध्यमातून आता राज्यात पुन्हा एकदा ईडीचे कारवाई सत्र सुरू झाल्याचे मानले जात आहे. संजय पांडे यांची सीबीआय आणि ईडी यांनी अलीकडच्या काळात कसून चौकशी केली होती. तर त्यांना ईडीने अटक केली आहे.