जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली काहीही कारण नसतांना महिला व तिच्या मुलगीला विट मारून दुखापत केल्याची घटना मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल काशिनाथ नेटके (वय-३२) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कारण नसतांना गोपाल नेटके याची पत्नी व मुलगीला गावात राहणारे गणेश रघुनाथ बारी आणि सागर रामकृष्ण काटोले यांनी विट मारून फेकली. यात महिला आणि मुलगी जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी गोपाल नेटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजता दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.