मुंजोबा मंदिराजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव ते भुसावळ रोडवरील नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. या घटनेबाबत बुधवार २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात कारचालका विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज जगन ठाकूर (वय-३५, रा.दीनदयाल नगर भुसावळ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते नशिराबाद रोड दरम्यान असलेल्या मुंजोबा मंदिराजवळ भरधाव कार क्रमांक (एमएच ४७ एबी ७४९) दुचाकी क्रमांक ( एमएच १९ सीसी ५६६०) य याला जोरदार धडक दिल्याची घटना १४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. या अपघातात दुचाकीस्वार धनराज ठाकूर या तरुणाचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी अखेर बुधवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कारवरील अज्ञात चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलीयार खान हे करीत आहे.

Protected Content