अमळनेरात प्रथमच उन्हाळी बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिर

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनदाई माता शैक्षणिक संस्था अमळनेर मार्फत अमळनेर शहरात प्रथमच नवोदित खेळाडूंसाठी उन्हाळी बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक ६ मे ते ३० मे दरम्यान दररोज सायंकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत धनदाई माता कला व विज्ञान महाविद्यालय, ढेकुसिम रोड अंमळनेरच्या बास्केटबॉल मैदानावर आयोजित केले आहे.

सदर शिबिरासाठी तज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे सर्व बास्केटबॉल खेळ शिकण्याची आवड असलेल्या खेळाडूंनी जास्त जास्त संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा असे अवाहन धनदाई माता शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी अध्यक्ष बापूसाहेब के. डी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील व क्रीडा संचालक डॉ. शैलेश पाटील यांनी केले आहे.

Protected Content