समृध्दी महामार्गावर अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्यामुळे तीन ठार

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृद्धी महामार्गावर ५ मे रोजी आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका अज्ञात वाहनाने कारला जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान अपघातातील जखमी आणि मृत हे सर्व जण छत्तीसगडचे रहिवासी असल्याचे माहिती आहे.जखमींवर संभाजीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

Protected Content