आळंदीहून परतणाऱ्या भरधाव कारची एसटी बसला धडक; चार ठार, तीन जखमी

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धोकादायक वळणावर भरधाव कारची समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक बसून झालेल्या अपघातात अहमदनगर जिल्हयात श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील चार भाविक ठार झाले आहेत, तर तीन जण गंभीर जखमी झाले . ही घटना ४ मे रोजी दुपारच्या सुमारास श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव परिसरात घडली. पारगाव सुद्रीक येथील भाविक कारने आळंदी येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून करून पारगाव सुद्रीक (ता. श्रीगोंदे) येथे येत होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ढवळगाव परिसरातील कुकडी चारी क्रमांक ३४ च्या धोकादायक वळणावर कारची शिरूरकडे जाणाऱ्या श्रीगोंदे-बेलवंडी- शिरूर एसटी बसला (एमएच १४ बीटी ०८७३) धडक बसली.

मृतांमध्ये पारगाव सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ ननवरे, पारगाव सेवा संस्थेचे संचालक हरी लडकत, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मडके, दत्तात्रय खेतमाळीस यांचा समावेशआहे. गंभीर जखमी तिघांपैकी चालक विठ्ठल ढोले, रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदे, रंगनाथ खेतमाळीस या दोन जणांना शिरूर येथील वेदांत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, तर रोहिदास सांगळे यांना ढवळगाव येथील आनंदवन येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. जखमी तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

Protected Content