जळगाव– नवव्या मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद अजय जिमखाना संघाने मिळविले, तर स्पर्धेचे आयोजक जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनचा संघ उपविजेता राहिला.
एकलव्य क्रीडा संकुल येथे आयोजित सदर स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघाने वाय.सी.सी. संघाचा तर अजय जिमखाना संघाने आर. सी.सी. संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
अटीतटीच्या अंतिम सामन्यात अजय जिमखाना शेवटच्या षटकात शहर व तालुका संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज गजानन देशमुख, उत्कृष्ट फलंदाज विजय अग्रवाल, मालिकविर स्वप्निल सूर्यवंशी, फेयर प्ले पुरस्कार अमळनेर संघाला मिळाला.
जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आयोजक जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजु खेडकर,मातोश्री फायनान्सचे अभिजित पाटील,भुसावळ वाय. सी. सी.संघाचे श्री. ट्रॅव्हर, मिलिंद शिंदे,शरीफ पिंजारी, गितेश गुजराती,बाबा शिर्के, संजय पोळ,हेमंत वाघ, दीनानाथ भामरे आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीते साठी ऍड.नितीन देवराज, किरण चौधरी, नितीन पाटील, सुमित अहिरराव,ज्ञानेश्वर कोळी, केतन अहिरराव आदींनी परिश्रम घेतले.